Thursday, 20 December 2018

शहरात मेट्रोचा दोन किलोमीटर अंतराचा स्पॅन पूर्ण

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत दापोडीतील हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंतच्या मार्गावर पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत एकूण 2 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गिकेचा स्पॅन पूर्ण झाला आहे. नव्या वर्षात फेबु्रवारीत त्यावर लोहमार्ग (ट्रॅक) बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. मार्गिकेसाठी सेगमेंट जुळवणीचे काम गर्डर लाँचरच्या विविध 3 मशिनने सुरू आहे. खराळवाडी येथे बसविलेल्या गर्डर लाँचरने संत तुकारामनगर येथील मेट्रो स्टेशनपर्यंत स्पॅन जुळवणीचे काम पूर्ण झाले आहे. स्टेशनच्या कनकोर्स व आर्म पिलरचे काम सुरू असल्याने तेथे मशिन उतरवून स्टेशनच्या पुढील पिलरवर चढविले जाणार आहे. 

No comments:

Post a Comment