Friday 7 December 2018

प्रकल्प दहा वर्ष रखडल्याच्या मुद्द्यावरून सहशहर अभियंता राजन पाटील यांची पळवाट

पिंपरी चिंचवड : चिखली येथील घरकुल प्रकल्पातील सदनिका बांधून तयार असूनही, लाभार्थ्यांना वाटप करण्यास दिरंगाई करणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला रिपब्लिकन युवा मार्चाच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी (दि. 4) ताळ्यावर आणले. या आंदोलकांनी सदनिका वाटपाला विलंब का होतोय? याचा जाब विचारला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकार्‍यांनी 9 इमारतीतील 378 सदनिका लाभार्थ्यांना हस्तांतरासाठी त्वरित कार्यवाही सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन आंदोलकांना दिले. दहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम पूर्ण करत नसलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी अजिज शेख यांनी केली. परंतु, सहशहर अभियंता राजन पाटील यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यामार्फत आंदोलकांना घरकुल प्रकल्पाच्या कामाला 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे लेखी उत्तर देऊन पळवाट शोधली.

No comments:

Post a Comment