पिंपरी-चिंचवड : नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या काळेवाडी फाटा ते देहू आळंदी चिखली रस्ता, देहू ते आळंदी आणि आळंदी ते बोपखेल या नवीन बीआरटी मार्गावर धावण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएल)बस उपलब्ध नाहीत. पीएमपीएलच्या ताफ्यातील 990 बसपैकी बीआरटी संचलनासाठी केवळ 425 बस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नवीन बीआरटी मार्गावर बस सोडण्यास महामंडळ असमर्थ असल्याचे, पीएमपीएमएलच्या महाव्यवस्थापकांनी महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे नवीन बीआरटी मार्ग सुरु होण्यास विलंब होणार आहे.
No comments:
Post a Comment