पिंपरी : राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील व सहाय्यक अधिकारी सुबोध मेडसिकर यांच्या पुढाकाराने ‘हेल्प डेक्स’ सुरु करण्यात आले आहे.
वाहन परवाना, वाहन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, खटला संदर्भातील केसेस, वाहन हस्तांतर आदी कामे कुठे होतील. याबाबत माहिती नागरिकांना नसते. नागरिकांना संपूर्ण कार्यालयात धावपळ होते. त्यामुळे त्यांचा भरपूर वेळ व श्रम वाया जातात. यामुळे अनेकवेळा नागरिकांच्या मनात आरटीओ’च्या कार्यालया संबंधित नकारात्मक भावना निर्माण होती. मात्र, त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी नागरिकांसाठी आता हेल्प डेक्स’ सुरु करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment