पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाकडून महिला बालकल्याण, मागासवर्गीय योजना, अपंग कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य जनतेशी संबंधित कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याने या विभागात लोकप्रतिनिधींचा कायम राबता असतो. या विभागात प्रामुख्याने सामाजिक कार्यातील पदवी (एम.एस. डब्ल्यू) असलेले प्रशिक्षित कर्मचार्यांची आवश्यकता भासते. मुख्य समाज विकास अधिकारी, समाज विकास अधिकारी व समाजसेवक ही सर्व पदे एम.एस. डब्ल्यू. शैक्षणिक अर्हता असलेल्या कर्मचार्यांचा यात समावेश आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागात समाज सेवक कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्याला जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास विलंब झाल्याने त्यांना महापालिका सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरवस्ती विकास योजना विभागातील समाज सेवकांची सर्वच पदे आता रिक्त झाली आहेत.
No comments:
Post a Comment