पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतीमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविणे, स्पर्धा परीक्षा केंद्रे अद्ययावत करणे, पडून असलेल्या भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे अशा विविध कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्यांना दिल्या. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, जलतरण तलाव, कुस्ती केंद्र यांना महापौर जाधव यांनी भेटी दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शनिवारी आठही प्रभाग अध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांची बैठक घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभाग अध्यक्ष अनुराधा गोरखे, भीमा फुगे, कमल घोलप, करुणा चिंचवडे, अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, सर्व प्रभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, नगररचना, उद्यान, क्रीडा, भूमि जिंदगी, आरोग्य विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment