प्राधिकरणातील मुख्य चौक तसेच रस्त्यांवर व पदपथांवर फळ विक्रेते, खाद्यपर्थांच्या हातगाड्या आणि चायनीज स्टॉल चालकांनी अतिक्रमण केल्याने बकालपणा वाढला आहे. नियोजित महापौर बंगल्याजवळील रस्त्यावर सायंकाळच्यावेळी एका रांगेत जवळपास दहा ते पंधरा चायनीज स्टॉल लागलेले असतात. संभाजी चौकाला लागुन असलेल्या पदपथावर वडा-पावच्या हातगाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना या पदपथाचा वापर करता येत नाही. टिळकचौकातील पदपथांवर भेळपुरी तसेच इतर खाद्यपर्थांच्या सुमारे पंधरा ते वीस हातगाड्या लागलेल्या असतात तर ग्राहकांच्या दुचाकी गाड्या रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केल्या जात असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होते. पदपथ व रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या हातगाड्या व चायनिज स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक नागरीकांची मागणी आहे.
No comments:
Post a Comment