पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील प्रत्येक विकासकामाच्या निविदेत ‘रिंग’ होत आहे. सत्ताधारी भाजप पदाधिकारी, प्रशासन आणि ठेकेदार संगनमताने ‘रिंग’ करुन करदात्या जनतेच्या पैशांची लूट करत आहेत. गेल्या दोन महिन्यात स्थापत्य विषयक बारा कामे वाढीव दराने दिल्याने महापालिकेला सुमारे पंचवीस कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे. स्थापत्यविषयक कामांना मोजकेच ठेकेदार निविदा भरतात. रिंग करुन त्यांच्यापैकी एकाला आळीपाळीने काम मिळत आहे. त्यामुळे रिंग करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment