पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात प्रशस्त रस्ते असूनही पुरेशा प्रमाणात पदपथ नसल्याचे वास्तव आहे. त्यातच सेवा वाहिन्यांसाठी वेळोवेळी पदपथ खोदून त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पादचाऱ्यांपुढील अडथळ्यांची शर्यत संपण्याचे नाव घेत नाही. खोदलेल्या पदपथांचा राडारोडा देखील उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्याची रया गेली आहे. शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला असताना पादचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका महापालिकेने घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment