पुणे - मागील वर्षी रेडी रेकनरमधील दर "जैसे थे' ठेवत दिलासा देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागाने यंदा देखील आश्चर्यांचा धक्का दिला. पुढील आर्थिक वर्षासाठी (2019-20) पुणे जिल्ह्याच्या रेडी रेकनरच्या दरात सरासरी 1.74 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे; तर पुणे महापालिका हद्दीत 0. 64 टक्के, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1. 85 टक्के, ग्रामीण भागात 3.20 टक्के, शहरालगतच्या गावांमध्ये (प्रभाव क्षेत्र) 1.08 टक्के आणि नगरपालिका हद्दीमध्ये 1.91 टक्के वाढ प्रस्तावित आहे. त्यामुळे मोकळ्या जागांच्या किमतीबरोबरच घरांच्या किमतीमध्ये अल्पशी वाढ होणार आहे.
No comments:
Post a Comment