Saturday, 18 April 2020

पिंपरीत अंध कलाकारांनी केले डोळसपणे समाजप्रबोधन

पिंपरी - आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात दृष्टी आणि आवाजाला खूप महत्त्व आहे. आवाज दृष्टीहिनांचे सामर्थ्य तर स्पर्श हे माध्यम. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्श हे माध्यम पण त्यांच्यासाठी व्यर्थ ठरले आहे. आपण सर्वजण सिनेमे, टीव्ही पाहू शकतो. सोशल मीडियावर रमू शकतो. खिडकीतून का होईना सूर्योदय आणि सुर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो. किती बोअर झालोय यार असा सूर ही वारंवार आळवतो. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्रभरातील अंध कलाकार लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अंध फेरीवाल्यांसाठी दूत ठरले आहेत. एवढ्यावरच न थांबता डोळसांनाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे.

No comments:

Post a Comment