पिंपरी - कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. संक्रमित व्यक्ती शोधण्यापासून त्यांच्यावर प्रभावी उपचार करणे, लॉकडाउन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांना नियोजन करावे लागत आहे. बंदोबस्तासाठी त्यांना पोलिसांची चांगली साथ मिळत आहे. मात्र, राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढतो आहे. गोपनीय माहितीसाठी प्रशासनाच्या अगोदर आपापल्या प्रभागात व्हायरल केली जात असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे "राजकारण्यांनो!, मदत नको पण, हस्तक्षेप आवरा,' असे सांगण्याची वेळ आली असल्याचे गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांवरून दिसते आहे.
No comments:
Post a Comment