Tuesday, 21 April 2020

पिंपरी चिंचवडमध्ये आज कोरोनाचा एकही रूग्ण नाही; तर गेल्या चार दिवसांत ६ जण ‘कोरोनामुक्त’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड करांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाग्ररस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होती. मात्र आज दि.२० रोजी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. तर आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या चार दिवसात तब्बल ६ रुग्ण बरे झाले असून ‘कोरोनामुक्त’ झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment