पिंपरी - आयटी कंपन्यांना 50 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकारेपणे पालन करत आजपासून (ता.20) कामावर रुजू होण्याच्या सूचना कंपन्यांनी दिल्या आहेत. मात्र, आयटीतील बड्या कंपन्यांमध्ये निम्म्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक असल्याने गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. धोक्याची घंटा लक्षात घेता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र फोरम फाईट असोसिएशनचे प्रमुख पवनजीत माने यांनी निवेदनाद्वारे वर्क फ्रॉम होमच सुरू ठेवण्याची कैफियत मांडली आहे.
No comments:
Post a Comment