Wednesday, 18 December 2013

नागरिकांनी मांडल्या समस्या

नेहरूनगर : पिंपरी पोलीस आणि पिंपरी पोलीस दक्षता कमिटी यांच्या वतीने वास्तुउद्योग येथे महिला व नागरिक समस्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी उपस्थित पोलीस पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांना प्रश्न विचारले. 

घरफोडीच्या घटना वाढल्या

पिंपरी : चिंचवडमधील टपाल कार्यालयासह विविध ठिकाणी घडलेल्या चार घरफोडींच्या घटनेत चोरट्यांनी सुमारे ७ लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भोसरी, हिंजवडी, पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
चिंचवडमधील चापेकर चौकात असलेल्या टपाल कार्यालयाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी २0 हजार ६७८ रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ ते रविवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शंकर मुकिंदा मडेल (वय ५८, रा. नवी सांगवी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

मतिमंद संगोपनासाठी मिळणार अर्थसाह्य

पिंपरी : महानगरपालिका हद्दीतील ५ वर्षांपुढील मतिमंदांचा सांभाळ करणारे पालक व संस्थांना महापालिकेतर्फे अर्थसहाय देण्याची योजना राबविण्यात येत आहे. सन २0१२-२0१३ या वर्षासाठी पात्र झालेल्या ७३२ लाभार्थींना एप्रिल ते सप्टेंबर २0१३ व ऑक्टोबर २0१३ ते मार्च २0१४ या कालावधीकरिता दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ८७ लाख ८४ हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली. त्याचबरोबर सुमारे ७ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांनाही मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नवनाथ जगताप होते.

महिला सक्षमीकरण योजनेत घोटाळा

पिंपरी - महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मंगळवारच्या (ता. 17) स्थायी समितीच्या बैठकीत गाजला. पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने गेल्या सात वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या प्रशिक्षणासाठी 51 कोटी रुपये खर्चून एकही महिला स्वावलंबी झाली नाही; तसेच या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आशा शेंडगे यांनी केला. त्यासंदर्भात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा त्यांनी काही काळ जमिनीवर बसून निषेध केला. 

पाचशेचार लाभार्थ्यांच्या सदनिका निश्‍चित

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वस्त घरकुल योजनेतील 504 लाभार्थ्यांच्या सदनिका संगणकीय सोडतीद्वारे मंगळवारी (ता.

हिंजवडी टप्पा तीनसाठी जमीन सक्तीने घेणार

पुणे -&nbsp हिंजवडी टप्पा तीनसाठी माण आणि भोईरवाडी येथील जमिनीचे भूसंपादन करण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा 'मास्टर प्लॅन' अंतिम करा



पिंपरी -&nbsp पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या बृहत्‌ आराखड्याबाबत (मास्टर प्लॅन) सुचविलेल्या विविध सूचनांचा समावेश करून त्याला अंतिम स्वरूप द्या, असे विभागीय आयुक्त तथा नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंगळवारी (ता.