Wednesday, 29 November 2017

प्रॉपर्टी कार्ड मिळणार ऑनलाइन

डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात

सातबारा आणि फेरफार हे ऑनलाइन मिळण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असताना, आता भूमि अभिलेख विभागाकडून मिळकत पत्र (प्रॉपर्टी कार्ड) हेदेखील ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याबाबतची डिजिटायझेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.

महापालिकेचा स्वीडनसोबत करार?

  • आयुक्‍ताची माहिती ः “स्मार्ट सिटी’तील कामांची तयारी
पिंपरी, (प्रतिनिधी) – प्रदुषणविरहीत सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन घनकचरा संकलन व त्याचे विघटन व्यवस्थापन करण्यासाठी स्वीडनची राजधानी स्टॉकहोल्ममध्ये राबवलेली संकल्पना पिंपरी-चिंचवडमध्ये राबवता येऊ शकते. त्यासाठी नेमके काय करता येईल, हे जाणून घेण्यासाठी स्वीडन येथील शिष्ठमंडळ पुढील महिन्यात पिंपरी-चिंचवडला भेट देणार आहे. या भेटीदरम्यान स्वीडन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील करार करण्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आयुक्‍त श्राव

Bapat urges hoteliers to pass on reduced GST benefits to patrons

PIMPRI CHINCHWAD: State minister for food and civil supplies Girish Bapat on Monday appealed to the hoteliers to pass on the benefits of the reduced goods and services tax (GST) rates to their customers.

भोसरीकरांची कोंडी

पिंपरी - पदपथांवरील अतिक्रमणे, रस्त्याच्या कडेला उभी वाहने, अरुंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा आणि जीव मुठीत घेऊन वाट शोधणारे विद्यार्थी व पादचारी... हे नित्याचे दृश्‍य आहे भोसरीतील आळंदी रस्त्याचे. 
रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यालगतच खासगी दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे मूळचा अरुंद रस्ता अधिकच अरुंद होतो. वाहने चालविताना त्रेधातिरपिट उडते. सकाळी, सायंकाळी विशेषतः गुरुवार, रविवार आणि अन्य सुटीच्या दिवशी वाहतूक कोंडी ही वाहनचालकांची परीक्षा घेणारी ठरते. 

शहरात धावणार मिडी गाड्या

पिंपरी - शहरातील अंतर्गत मार्गांवर लवकरच पीएमपीच्या नवीन मिडी गाड्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. या गाड्या आकाराने लहान असल्याने त्या मोठ्या गाड्यांच्या तुलनेत जास्त लवकर प्रवाशांची वाहतूक करू शकतील. डिसेंबरच्या अखेरीला किंवा नववर्षाच्या प्रारंभी या गाड्यांची सेवा शहरास उपलब्ध होईल.

अजगर, मगरीची चोरी, सापांच्या मृत्यूवरून वादंग

पिंपरी - महापालिकेच्या संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील अजगर, मगरीची चोरी आणि सापांचा मृत्यू आदी मुद्‌द्‌यांवरून मंगळवारी (ता.28) सर्वसाधारण सभेत जोरदार वादंग झाले. सभेमध्ये उपसूचना न वाचता मंजूर केल्या जात असल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिकेत सत्तेत असताना ढिगाने उपसूचना मंजूर केल्या जात होत्या, असा प्रतिटोला भाजपच्या सदस्यांनी लगावला.

अपंगांना पेन्शन योजना

शहरातील अपंगांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. आर्थिक उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नसलेल्या आणि तीन वर्षांपासून शहरात अस्तित्त्वात असलेल्या अपंगांना योजनेचा लाभ मिळणार आहे. जन्मतःच अपंग असणाऱ्यांना योजनेत सामावून घेण्याची उपसूचना मात्र फेटाळण्यात आली.