Wednesday, 29 November 2017

भोसरीकरांची कोंडी

पिंपरी - पदपथांवरील अतिक्रमणे, रस्त्याच्या कडेला उभी वाहने, अरुंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा आणि जीव मुठीत घेऊन वाट शोधणारे विद्यार्थी व पादचारी... हे नित्याचे दृश्‍य आहे भोसरीतील आळंदी रस्त्याचे. 
रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यालगतच खासगी दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे मूळचा अरुंद रस्ता अधिकच अरुंद होतो. वाहने चालविताना त्रेधातिरपिट उडते. सकाळी, सायंकाळी विशेषतः गुरुवार, रविवार आणि अन्य सुटीच्या दिवशी वाहतूक कोंडी ही वाहनचालकांची परीक्षा घेणारी ठरते. 

No comments:

Post a Comment