पिंपरी – भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलासभोवती हातगाडीवाल्यांचा विळखा पडल्याने बकालपणा वाढला आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी महापालिकेला पोलीस प्रशासन मदत करत नाही. या कारवाईसाठी शंभर पोलिसांची मागणी केली आहे, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. पोलीस प्रशासनाचे मनुष्यबळ उपलब्ध होताच हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अतिक्रमण विरोधी विभागाला दिले आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 11 December 2017
आकुर्डीत लाखो लीटर पाण्याची नासाडी
चिंचवड – शहरात सर्वत्र विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या तक्रारी असताना आकुर्डी येथे जलवाहिनी फुटून रविवारी (दि. 10) लाखो लीटर पाणी वायाला गेले. गंगानगर रस्त्यावर पाणीच पाणी झाले असताना जलवाहिनी महापालिकेची की एमआयडीसीची याबाबत संभ्रमावस्था असल्याने तब्बल साडेतीन तास पाण्याची नासाडी झाली.
कम्प्लिशन सर्टिफिकेट का गरजेचे?
सध्याच्या काळात घर घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. शहरात तर मोठ्या सोसायट्यांमध्ये मोठ्या इमारती असतात. बऱ्याचदा इमारत बाहेरून पाहिल्यावर चांगली दिसते. पण त्याचा अर्थ असा नव्हे की इमारत सुरक्षित आहे. बाहेरून चांगली दिसणारी इमारत आतूनही तितकीच सुरक्षित आणि मजबूत असेल असे बिलकुल नाही. मुंबईसारख्या ठिकाणी इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळतानाच्या घटना घडताना दिसतात. त्यामुळेच इमारत पूर्ण झाली आहे म्हणजे ती राहण्यायोग्य सुरक्षित आहे असा लोकांचा सर्वसाधारण विश्वास असतो. मात्र इमारत पूर्ण झाल्यावर तिला कम्प्लीशन किंवा पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही याचा विचार करणे जरूरीचे आहे.
शुल्क वाढीच्या निषेधार्थ पालकांचा घेराव
चिंचवड – शाळेच्या शुल्कवाढीला विरोध करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थी पाल्यांना गुणपत्रिका देण्यास नकार दिल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला घेराव घातला. हा प्रकार चिंचवड श्रीधरनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आज (शनिवारी) घडला.
करचुकवेगिरी करणे होणार अवघड
मुंबई – प्राप्तिकर न भरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) डाटा वापरण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून कर चुकवेगिरी करणे अवघड जणार असल्याचे वातावरण आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, अद्याप प्राथमिक टप्प्यात असलेल्या या प्रकल्पात सरकार एक डाटाबेस विकसित करू इच्छित आहे. या डाटाबेसच्या साह्याने कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांचे उत्पन्न प्राप्तिकर विवरणपत्रात दर्शविलेल्या उत्पन्नाशी जुळवून पाहण्याची सोय असेल. या डाटाचा वापर भूतकाळातील करचोरीचा छडा लावण्यासाठीही केला जाणार आहे, की फक्त भविष्यातील कर सुरक्षेसाठीच त्याचा वापर होईल, याबाबत कोणताही खुलासा सरकारने केलेला नाही.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, अद्याप प्राथमिक टप्प्यात असलेल्या या प्रकल्पात सरकार एक डाटाबेस विकसित करू इच्छित आहे. या डाटाबेसच्या साह्याने कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांचे उत्पन्न प्राप्तिकर विवरणपत्रात दर्शविलेल्या उत्पन्नाशी जुळवून पाहण्याची सोय असेल. या डाटाचा वापर भूतकाळातील करचोरीचा छडा लावण्यासाठीही केला जाणार आहे, की फक्त भविष्यातील कर सुरक्षेसाठीच त्याचा वापर होईल, याबाबत कोणताही खुलासा सरकारने केलेला नाही.
ई मोबिलीटी, सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन
पुणे - वायुप्रदूषण रोखण्यासाठी सुरक्षित, सोईस्कर आणि स्वस्त दरात सार्वजनिक वाहतूक, सायकल चालविण्यास प्राधान्य याबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी डीझेल वाहनांवर आगामी काळात बंदी आणण्यासंदर्भात धोरणाची आखणी, अशी पावले प्रामुख्याने युरोपीय देशांत उचलली जात आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे जगभरात दरवर्षी जवळपास 40 लाख नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. म्हणूनच जगभरातील अनेक देशांनी राक्षसरूपी वायुप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

धुलिकण मुक्तीचे चिनी मॉडेल
पुणे - आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाण्याने रस्ते धुणे आणि बांधकाम प्रकल्पांची धूळ रस्त्यावर येणार नाही याची प्रकर्षाने काळजी घेणे, या उपाययोजना परदेशांमध्ये केल्या जात असल्याने तेथील हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा कमी आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

Subscribe to:
Posts (Atom)