सध्याच्या काळात घर घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. शहरात तर मोठ्या सोसायट्यांमध्ये मोठ्या इमारती असतात. बऱ्याचदा इमारत बाहेरून पाहिल्यावर चांगली दिसते. पण त्याचा अर्थ असा नव्हे की इमारत सुरक्षित आहे. बाहेरून चांगली दिसणारी इमारत आतूनही तितकीच सुरक्षित आणि मजबूत असेल असे बिलकुल नाही. मुंबईसारख्या ठिकाणी इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळतानाच्या घटना घडताना दिसतात. त्यामुळेच इमारत पूर्ण झाली आहे म्हणजे ती राहण्यायोग्य सुरक्षित आहे असा लोकांचा सर्वसाधारण विश्वास असतो. मात्र इमारत पूर्ण झाल्यावर तिला कम्प्लीशन किंवा पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही याचा विचार करणे जरूरीचे आहे.
No comments:
Post a Comment