मुंबई – प्राप्तिकर न भरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) डाटा वापरण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून कर चुकवेगिरी करणे अवघड जणार असल्याचे वातावरण आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, अद्याप प्राथमिक टप्प्यात असलेल्या या प्रकल्पात सरकार एक डाटाबेस विकसित करू इच्छित आहे. या डाटाबेसच्या साह्याने कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांचे उत्पन्न प्राप्तिकर विवरणपत्रात दर्शविलेल्या उत्पन्नाशी जुळवून पाहण्याची सोय असेल. या डाटाचा वापर भूतकाळातील करचोरीचा छडा लावण्यासाठीही केला जाणार आहे, की फक्त भविष्यातील कर सुरक्षेसाठीच त्याचा वापर होईल, याबाबत कोणताही खुलासा सरकारने केलेला नाही.

No comments:
Post a Comment