पुणे - वायुप्रदूषण रोखण्यासाठी सुरक्षित, सोईस्कर आणि स्वस्त दरात सार्वजनिक वाहतूक, सायकल चालविण्यास प्राधान्य याबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी डीझेल वाहनांवर आगामी काळात बंदी आणण्यासंदर्भात धोरणाची आखणी, अशी पावले प्रामुख्याने युरोपीय देशांत उचलली जात आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे जगभरात दरवर्षी जवळपास 40 लाख नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. म्हणूनच जगभरातील अनेक देशांनी राक्षसरूपी वायुप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

No comments:
Post a Comment