Thursday, 28 December 2017

…अखेर मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला सुरुवात

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. त्यासाठी स्थायी समितीने ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दशक्रिया विधी घाटाचे काम सुरु झाल्यामुळे मोशीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

औषध भांडार विभागात घडतयं काय?

पिंपरी – महापालिकेच्या वैद्यकीय औषध भांडार विभागातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची औषध व विविध उपकरणांची खरेदी करण्यात येते. त्याच भांडार विभागाचे मुख्य व्यवस्थापक गेल्या पाच महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यांनी रजेवर असतानाच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज पाठविला आहे. परंतु, ते कोठे व कोणाच्या संपर्कात आहेत. याबाबत त्यांचे कुटुंबीयही काहीच सांगत नाहीत. त्यामुळे नेमकं काय घडलंय? अचानक रजा घेवून स्वेच्छानिवृत्ती मागतली आहे. याबाबत वैद्यकीय आणि पालिका प्रशासनाने कमालीची गोपनियता ठेवली आहे. याविषयी संबंधित अधिकारी माहिती देत नसल्याने वैद्यकीय भांडार विभागात नेमकं घडतय काय? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

“इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कामगारांची विभागणी

पिंपरी – महापालिकेच्या “इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रस्ते व गटर्स साफसफाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या 529 कामगारांची विभागणी करून त्यातील 253 कामगारांना “क’ आणि “ह’ तर उर्वरीत 276 कामगारांची नेमणूक “इ’ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील साफसफाई कामासाठी केली आहे. याकरिता पूर्वीच्याच निविदा रक्कमेत हे काम नवीन ठेकेदारासोबत करार करून देण्यात आले आहे. याबाबत मांडलेल्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

SC: Prove gram panchayats as developed as municipal areas

Pune: The Supreme Court recently told the owners of around 250 closed liquor establishments in the jurisdiction of gram panchayats to prove their areas were as developed as municipalities for the rollback of highway alcohol ban in those places.

पीपीएफ, एनएससीच्या दरात 0.2 टक्के कपात

नवी दिल्ली – विविध छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय बुधवारी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार पीपीएफ आणि एनएससीसारख्या छोट्या बचत योजनेवरील व्याजदरात 0.2 टक्के कपात करण्यात आली आहे. ही कपात जानेवारी ते मार्च 2018 या त्रैमासिक दरम्यान लागू राहणार आहे. मात्र वरिष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षाच्या बचत योजनांसाठी व्याजदर 8.3 टक्केच कायम राहणार आहे.

बालचमूंनी भरवला “आठवडे बाजार’

चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कै. विठ्ठलराव सखाराम सोनवणे प्राथमिक शाळा क्रमांक 93 मध्ये ग्राहक दिनानिमित्त आठवडा बाजार भरला होता.

दुर्मिळ गव्हाणी घुबडास जीवदान

– पशुप्रेमी मच्छिंद्र तापकीर यांची सतर्कता
पिंपरी – काळेवाडी-तापकीरनगर मधील पशूप्रेमी तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ गव्हाणी घुबडास जीवदान मिळाले.