Thursday, 15 March 2018

अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा

भोसरी - भोसरी, दिघीतील अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा पाठवून पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांद्वारे कोठेही विचारपूस न करता घाबरून टोळक्‍यांना पैसे दिले जात आहेत. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची कुजबूजही नागरिकांत आहे. महापालिकेने या विषयी हात झटकले आहेत. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसह त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्यांवरही कारवाईची गरज आहे.

रिंगरोडची निविदा रद्द करा

पिंपरी - शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या रिंगरोड (एचसीएमटीआर) प्रकल्पाच्या कोकणे चौक ते काळेवाडी फाटा या कामासाठी जागा ताब्यात नसताना महापालिकेने काढलेली निविदा तातडीने रद्द करावी, अशी मागणी घरबचाव संघर्ष समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी आठ मुद्दे उपस्थित करून सदरची निविदा रद्द केली जावी, असे म्हटले आहे.

निगडीत सांस्कृतिक कार्यक्रमात सात राज्यातील कलाकारांचा सहभाग

चौफेर न्यूज – त्रिपुरा, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालॅंड, सिक्कीम या पूर्वोत्तर सात राज्यातील कलाकारांनी अप्रतिम सौंदर्यपूर्ण नृत्ये सादर करुन रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निगडीतील नंदकिशोर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सात राज्यातील अडीचशे कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी सीआरपीएफचे उपकमांडंट सचिन गायकवाड, राज्य निदेशक संध्या देवताळे, मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलजा मोरे, प्रसिध्द कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका अश्‍विनी बोबडे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, सामाजिक कार्यकर्ते दीपक मोढवे पाटील आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या लेखापालांना सुरक्षा

चौफेर न्यूज   पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि नगररचना उपसंचालक यांनी अवघ्या दहा महिन्यात पाच हजार 300 कोटी रुपयांचे टीडीआर वाटप केले आहे. त्यातच नगररचना उपसंचालकाची बदली होऊन एक महिना उलटला तरी त्यांनी पदभार सोडला नाही. आयुक्तांनी देखील त्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे संशय वाढला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

“रेडझोन’बाबत सरकार सकारात्मक पण…!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड, मावळ भागातील रेडझोनची हद्द कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकार सकारात्मक आहे. परंतु, हा देशपातळीवरील निर्णय असल्याने त्यास विलंब लागेल, असे केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी स्पष्ट केले आहे.

रेडझोन संदर्भात खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट

चौफेर न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील रेडझोनची हद्द कमी करणे, मावळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मिसाईल प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांची खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेत चर्चा केली.

आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ

अमरवाणी न्यूज, १४ मार्च – सर्वोच्च न्यायालयाने बँक खाते व मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. पुढील निर्णय येईपर्यंत ही मुदतवाढ असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.