चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि नगररचना उपसंचालक यांनी अवघ्या दहा महिन्यात पाच हजार 300 कोटी रुपयांचे टीडीआर वाटप केले आहे. त्यातच नगररचना उपसंचालकाची बदली होऊन एक महिना उलटला तरी त्यांनी पदभार सोडला नाही. आयुक्तांनी देखील त्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे संशय वाढला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
No comments:
Post a Comment