Thursday, 15 March 2018

निगडीत सांस्कृतिक कार्यक्रमात सात राज्यातील कलाकारांचा सहभाग

चौफेर न्यूज – त्रिपुरा, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालॅंड, सिक्कीम या पूर्वोत्तर सात राज्यातील कलाकारांनी अप्रतिम सौंदर्यपूर्ण नृत्ये सादर करुन रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निगडीतील नंदकिशोर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सात राज्यातील अडीचशे कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी सीआरपीएफचे उपकमांडंट सचिन गायकवाड, राज्य निदेशक संध्या देवताळे, मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलजा मोरे, प्रसिध्द कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका अश्‍विनी बोबडे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, सामाजिक कार्यकर्ते दीपक मोढवे पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment