भोसरी - भोसरी, दिघीतील अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा पाठवून पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांद्वारे कोठेही विचारपूस न करता घाबरून टोळक्यांना पैसे दिले जात आहेत. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची कुजबूजही नागरिकांत आहे. महापालिकेने या विषयी हात झटकले आहेत. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसह त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्यांवरही कारवाईची गरज आहे.

No comments:
Post a Comment