Friday, 23 March 2018

विधवा, घटस्फोटित महिलांना पिंपरी पालिकेचा मदतीचा हात

पिंपरी पालिकेच्या वतीने १९९५-९६ पासून अशाप्रकारे अर्थसाहाय्य देण्यास सुरुवात केली.

लोहगाव विमानतळाने 80 लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला

पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळाने 2017-18 या वर्षात पहिल्यांदाच 80 प्रवासी वाहतुकीचा टप्पा गुरुवारी ओलांडला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) याची दखल घेऊन लोहगाव विमानतळाचे अभिनंदन केले आहे.

पाण्याची बाटली घ्या लेबल पाहून

पुणे -‘‘पाण्याची बाटली कितीला आहे हो काका,’’ असा प्रश्‍न विचारून तुम्ही अनेकदा पाण्याची बाटली विकत घेतली असेल; पण पोटात जाणारे हे पाणी कितपत सुरक्षित आहे, याची खातरजमा तुम्ही करता का? नसाल, तर यापुढे नक्की करा. कारण, वर्षभरात १५ कारखाने विनापरवाना बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निदर्शनास आले आहे.

पुण्यात धावणार ५०० ई-बस

पुणे - शहरात लवकरच ५०० इलेक्‍ट्रिक बस धावणार आहेत. खासगी कंपन्यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ई- बसचे सादरीकरण केले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी ५०० बस घेण्याच्या सूचना दिल्या. शिवाय नागपूर आणि नाशिकमध्येही ई-बस धावू शकतील का, याबाबत चाचपणी करण्यास सांगितले. 

पेव्हर ब्लॉक्‍स : निधीची नासधूस व पर्यावरण ऱ्हास

      चर्चा
सामान्यतः ब्लॉक्‍सचा वापर करून बनविलेले पदपथ पाच वर्षे टिकते; परंतु चुकीच्या पद्धतीने बसवल्यामुळे तो एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ब्लॉक जागेवर टिकत नाहीत. दुर्दैवाने, सध्या बहुतांश शहरांमध्ये अनेक ठिकाणी उखडलेल्या पेव्हर ब्लॉक्‍सचे चित्र दिसते. न्यायालयात याप्रकरणी अनेक याचिका प्रलंबित आहेत…

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रोटरी क्‍लबतर्फे मोफत तपासणी शिबीर

पिंपरी, (प्रतिनिधी) – जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षयरोग विभागाच्या सहकार्याने पिंपरी, फुलेनगरमधील नागरिकांची मोफत क्षयरोग तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोगाबाबतची जनजागृती देखील करण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून 100 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. क्षयरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर दैठणकर यांनी नागरिकांची तपासणी केली.

आयकर विभागाने कायम ठेवली ‘आधार’सक्ती

चौफेर न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने विविध सरकारी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान आणि विविध सेवा यांना ‘आधार’शी जोडण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही ‘आधार’सक्ती आयकर विभागाने कायम ठेवली असल्यामुळे आधार नोंदणी नसलेल्या करदात्यांना आयकर परतावा (टॅक्स रिटर्न) भरताना अडचणी निर्माण होत आहेत.