Friday, 23 March 2018

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रोटरी क्‍लबतर्फे मोफत तपासणी शिबीर

पिंपरी, (प्रतिनिधी) – जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षयरोग विभागाच्या सहकार्याने पिंपरी, फुलेनगरमधील नागरिकांची मोफत क्षयरोग तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोगाबाबतची जनजागृती देखील करण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून 100 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. क्षयरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर दैठणकर यांनी नागरिकांची तपासणी केली.

No comments:

Post a Comment