Saturday, 18 April 2020

महापालिकेने वायसीएम व भोसरी रुग्णालयासाठी २५ आयसीयू बेड, १२ व्हेंटिलेटरची खरेदी

पिंपरी - कोरोनाबाधितांवर उपचारासाठी महापालिकेने वायसीएम व भोसरी रुग्णालयासाठी २५ आयसीयू बेड व १२ व्हेंटिलेटरसह अन्य आवश्‍यक उपकरणे व साहित्य खरेदी केले आहे. तसेच, कंपन्यांच्या सीएसआर फंडाडून तीन व्हेंटिलेटर वायसीएमला मिळाले आहेत. V

PCMC forms tech war room to combat Covid-19


PCMC starts vegetable and fruit centres in 9 wards


मॉर्निग वॉक करणाऱ्यांकडून पोलिसांनी करून घेतली परेड

पिंपरी: मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना निगडी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी झटका दिला. सुमारे ३५ नागरिकांकडून परेड, सुर्यनमस्कार तसेच यापुढील काळात नियम मोडणार नाही याची शपथ दिली. शनिवारी (दि. १८) सकाळी ही कारवाई करीत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला. यामध्ये माजी महापौराचाही समावेश आहे. 

राजकारण्यांनो! मदत नको, हस्तक्षेप आवरा

पिंपरी - कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. संक्रमित व्यक्ती शोधण्यापासून त्यांच्यावर प्रभावी उपचार करणे, लॉकडाउन असल्यामुळे जीवनावश्‍यक वस्तू सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांना नियोजन करावे लागत आहे. बंदोबस्तासाठी त्यांना पोलिसांची चांगली साथ मिळत आहे. मात्र, राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढतो आहे. गोपनीय माहितीसाठी प्रशासनाच्या अगोदर आपापल्या प्रभागात व्हायरल केली जात असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे "राजकारण्यांनो!, मदत नको पण, हस्तक्षेप आवरा,' असे सांगण्याची वेळ आली असल्याचे गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांवरून दिसते आहे.  

पिंपरीत आठवडे बाजार झाले सुरू; ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना प्रवेश बंदी

पिंपरी : नागरिकांना फळे व भाजीपाला मिळावा, यासाठी शुक्रवारपासून (ता.17) शहरात 16 ठिकाणी आठवडे बाजार सुरू झाले. मात्र, बाजार परिसरात 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 5 वर्षांखालील मुलांना प्रवेश नसेल, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्‍त अजित पवार यांनी दिली. 

पिंपरीत अंध कलाकारांनी केले डोळसपणे समाजप्रबोधन

पिंपरी - आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात दृष्टी आणि आवाजाला खूप महत्त्व आहे. आवाज दृष्टीहिनांचे सामर्थ्य तर स्पर्श हे माध्यम. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्श हे माध्यम पण त्यांच्यासाठी व्यर्थ ठरले आहे. आपण सर्वजण सिनेमे, टीव्ही पाहू शकतो. सोशल मीडियावर रमू शकतो. खिडकीतून का होईना सूर्योदय आणि सुर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो. किती बोअर झालोय यार असा सूर ही वारंवार आळवतो. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्रभरातील अंध कलाकार लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अंध फेरीवाल्यांसाठी दूत ठरले आहेत. एवढ्यावरच न थांबता डोळसांनाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे.