निगडीतील विहिरीत ११00 किलो गांजा: पिंपरी । दि. २२ (प्रतिनिधी)
निगडी ओटास्कीम या रहिवाशी वसाहतीतील एका जुन्या विहिरीत ११00 किलो वजनाचा भिजलेल्या अवस्थेतील गांजा आढळला. मंगळवारी सकाळी निगडी पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेतला. तो कोठून आला आणि कोणी विहिरीत टाकला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक मोठय़ा प्रमाणावर राहत असलेल्या ओटास्कीम भागात सर्रास गांजा विक्री होत असावी अशी शक्यता यामुळे बळावली आहे.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार भोसले-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील १३ आणि १५ क्रमांकाच्या इमारतींलगत जुनी विहिर आहे. या विहिरीत गांजा असल्याची माहिती एका नागरिकाने सोमवारी रात्नी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली होती. नियंत्नण कक्षाकडून आम्हाला माहिती मिळताच मंगळवारी सकाळी दहाला आमचे कर्मचारी ओटास्कीम परिसरात पोहोचले. आलेल्या फोनबाबतची शहानिशा करण्यासाठी विहीरीजवळ पोहोचले. त्यावेळी तिच्यात मोठय़ाप्रमाणावर पोत्यांमध्ये भरलेला आणि काही सुट्या अवस्थेतील गांजा आढळला. तो बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.
गाजांची ८ पोती बाहेर काढण्यात आली. विहिरीतील पाण्यामुळे भिजलेला सुटा गांजाही बाहेर काढून प्रथम ट्रकमध्ये आणि नंतर पोत्यांमध्ये भरण्यात आला. ११00 किलो वजनाचा ३२ पोते गांजा आमच्या ताब्यात असून तो सुकल्यानंतरच त्याचे खरे वजन आणि किंमत कळू शकेल अशी माहिती निरीक्षक भोसले यांनी दिली. लाखो रुपयांचा हा गांजा असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
No comments:
Post a Comment