Wednesday, 13 June 2012

सीबीआयकडून संशयितांची पॉलिग्राफ चाचणी सुरू

सीबीआयकडून संशयितांची
पॉलिग्राफ चाचणी सुरू
: सतीश शेट्टी खून प्रकरण

पिंपरी। दि. २१ (प्रतिनिधी)

सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येप्रकरणातील संशयितांची पॉलिग्राफ चाचणी सुरू झाली आहे. येत्या रविवारपर्यंत ती सुरू राहणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. ही चाचणी आकुर्डी येथील सीबीआयच्या कार्यालयात सुरु आहे.

तळेगाव दाभाडे येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची २0१0 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत असून त्यांनी न्यायालयाकडे १९ एप्रिल आणि २ मे रोजी १0 संशयितांची पॉलिग्राफ चाचणी करण्यास संमती मिळविली होती.

दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या पथकाने आजपासून संशयितांची तपासणी सुरू केली आहे. ती येत्या रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. सोमवारी कोणत्या व्यक्तीची तपासणी झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर, तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर, पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, उपनिरीक्षक नामदेव कवठाळे, माजी हवालदार कैलास लबडे, हवालदार रमेश नाले, पोलीस नाईक राजेंद्र मिरागे, शहाजी आठवले, शाम दाभाडे यांच्या पॉलिग्राफ चाचणीला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

तळेगावचे उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, नगरसेवक बापू भेगडे, जयंत डोंगरे, किशोर आवारे, हनुमंत काळोखे, उमेश फुगे, सुनील जाधव, अँड. विजय दाभाडे, प्रमोद वाघमारे, नवनाथ शेलार, डोंगर्‍या राठोड, सागर खोल्लम तसेच यांच्या पॉलिग्राफ चाचणीला परवानगी दिली होती. मावळातील नामांकित मंडळींची तपासणी होणार असल्याने मावळात खळबळ उडाली आहे.

शेट्टी यांनी माहितीच्या अधिकारात उघडकीस आणलेले गैरव्यवहार व त्यासंबंधातील व्यक्तीची, संस्थाप्रमुखांची चौकशी सीबीआयने केली. सीबीआयने या प्रकरणातील संशयितांकडे आपला मोर्चा वळविला आहे. संशयितांपैकी कोणाचा शेट्टीच्या हत्येशी संबंध आहे का? हे तपासण्यासाठी १९ एप्रिलला झालेल्या सुनावणीत संशयितांच्या पॉलिग्राफ चाचणीची परवानगी मागितली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

No comments:

Post a Comment