http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31295&To=6
चिखलीत 27 कारच्या काचा फोडल्या ;
अज्ञात व्यक्तीचा खोडसाळपणा
चिखली, 3 जुलै
चिखली मोरे वस्ती येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या 27 वाहनांच्या काचा सोमवारी (ता. 2) रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींने फोडल्याचा प्रकार आज, मंगळवारी (ता. 3) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आला. याच भागात राहाणा-या व्यक्तीने खोडसाळपणे हे कृत्य केले असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
No comments:
Post a Comment