Friday, 13 July 2012

निगडीच्या स्मशानभूमीत दाखल्याविना अंत्यसंस्कार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31334&To=6
निगडीच्या स्मशानभूमीत दाखल्याविना अंत्यसंस्कार
पिंपरी, 4 जुलै
स्मशान दाखल्याशिवाय स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यास मनाई आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडीतील 'अमरधाम' या स्मशानभूमीत दाखल्याविनाच अंत्यसंस्कार होत असल्याचा खळबळजनक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. स्मशान दाखला तपासण्यासाठी याठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने हा प्रकार घडत आहे. एका राजकीय पुढा-याच्या ठेकेदार संस्थेपुढे महापालिका प्रशासन हातबल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. संस्थेच्या या मुजोरपणामुळे एखाद्या गंभीर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी या स्मशानभूमीचा वापर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment