http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31382&To=6
कर्नाटक सरकारच्या बरखास्तीसाठी
बेळगावच्या महापौरांची पिंपरीकरांना साद
बेळगाव महापालिका सलग दुस-यांदा बरखास्त करुन कर्नाटक सरकारने मराठी द्वेष्ठपणा सिध्द केला आहे. उच्च न्यायालयाने थोबाड फोडूनही मराठी भाषकांची महापालिका वारंवार बरखास्त करणारे कर्नाटक सरकारच राष्ट्रपतींनी बरखास्त करावे आणि सीमा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा, अशी मागणी बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री यांनी शुक्रवारी (दि. 6) केली. बरखास्त केलेली बेळगाव महापालिका पुनःस्थापित करण्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
No comments:
Post a Comment