Friday, 13 July 2012

शिवसेनेकडून अतिक्रमण कारवाईचा सचित्र पंचनामा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31314&To=8
शिवसेनेकडून अतिक्रमण कारवाईचा सचित्र पंचनामा
पिंपरी, 3 जुलै
बेकायदा बांधकामे..., अतिक्रमित जागेवरील घरे... आरक्षित जागेवरील इमले... रेडझोनच्या हद्दीतील बांधकामे... नदीपात्रातील इमारती... या नावाखाली कामगारनगरीतील गोरगरिबांची घरे उध्वस्त करून त्यांना देशोधडीला लावायला निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता म्हणजे काळीकृट्ट राजवट ! याचाच अनुभव पिंपरी-चिंचवडकर घेत आहेत. संपूर्ण शहरच बेकायदा वसल्याचे सांगून रहिवाशांच्या घरादारांवर नांगर फिरवायला निघालेल्या काँग्रेसी सरकारच्या काळयाकुट्ट कारभाराचा पंचनामा शिवसेनेने केला आहे. 'निष्पाप नागरिकांवर अत्याचार का ?’ असा मार्मिक सवाल करणा-या या पत्रिकेचे पिंपरी-चिंचवडकरांनी जोरदार स्वागत केले असून राज्यकर्त्यांची तोंडे मात्र, काळवंडली आहेत.

No comments:

Post a Comment