Monday, 9 July 2012

प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय मिळकतींची नोंदणी केल्यास फौजदारी गुन्हा

http://www.mypimprichinchwad.com/प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय मिळकतींची नोंदणी...:

पिंपरी, 27 जून
अनधिकृत बांधकामे होऊ नयेत तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाची मंजुरी न मिळालेल्या प्रकल्पांतील मिळकतींची नोंदणी केल्यास यापुढे नोटरी किंवा दुय्यम निबंधक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महावितरण किंवा महापालिकेने अनधिकृत प्रकल्पांना कोणत्याही सेवा किंवा सोयीसुविधा पुरवू नयेत असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच अतिक्रमण होऊ नये म्हणून प्राधिकरणाच्या मिळकतींवर कुंपण घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

No comments:

Post a Comment