Monday, 9 July 2012

अखेर जुळून आला शुभाशिर्वादाचा 'राज'योग !

http://mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31109&To=9

अखेर जुळून आला शुभाशिर्वादाचा 'राज'योग !
पिंपरी, 25 जून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका अश्विनी मराठे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांचे महाविद्यालयापासूनचे प्रेमप्रकरण महापालिका निवडणुकीनिमित्त पिंपरी-चिंचवडकरांना माहीत झाले. प्रेमप्रकरण आणि त्यानंतर राजकारणात यशस्वी 'एण्ट्री' करणा-या अश्विनी मराठे यांचा सचिन चिखले यांच्याशी विवाह जुळून आला. मात्र, राज ठाकरे यांची उपस्थिती लाभावी म्हणून दोन मुहूर्तांवर पाणी सोडण्यात आले. ठाकरे यांनी उपस्थित राहण्यासाठी होकार दिल्यानंतर विवाहमुहूर्त निश्चित करण्यात आला आणि अखेर ठाकरे यांच्या आशीर्वादाचा 'राज'योग सोमवारी (दि. 25) घडून आला.

No comments:

Post a Comment