Thursday, 5 July 2012

'घरकुलात' सत्ताधा-यांनी खाल्ले गरीबांच्या टाळूवरचे लोणी ; शिवसेनेचे टीकास्त्र

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30997&To=9
'घरकुलात' सत्ताधा-यांनी खाल्ले गरीबांच्या
टाळूवरचे लोणी ; शिवसेनेचे टीकास्त्र
पिंपरी, 21 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घरकूल योजनेतील सदनिकांचा ताबा देण्यापूर्वीच त्याची दुरवस्था झाल्याचे शिवसेना नगरसेवकांच्या प्रकल्प पाहणी दौ-यातून गुरुवारी (दि. 21) उघड झाले. खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, प्लॅस्टरमधून कोसळणारे सिमेंट, भिंतीना निघालेले पापुद्रे, स्वच्छतागृहांचे तुटलेले कडी-कोयंडे यातून कामाच्या निकृष्ट दर्जाचे दर्शन घडले. या प्रकल्पाच्या माध्यमातून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गरिबांच्या टाळूवरचे लोणी खायचे काम केले असल्याचे कोरडे शिवसेना गटनेते श्रीरंग बारणे यांनी ओढले.

No comments:

Post a Comment