विरोधकांच्या 'राडा'च्या भीतीने <br>आयुक्तांची पहिलीच सभा तहकूब
पिंपरी, 20 जून
महापालिका अंदाजपत्रकावरील कोट्यवधींच्या उपसूचना, अनधिकृत बांधकामांना दुप्पट कर आकारणी, घरकुलासाठी पंधरा दिवसात पूर्ण पैसे भरण्याची ताकीद, आळंदीला पाणीपुरवठा, डॉक्टर भरती प्रकरण आदी वादग्रस्त विषयांवर विरोधकांचा राडा होण्याच्या भीतीने महापालिकेची सभा बुधवारी (दि. 20) तहकूब करण्यात आली. आपल्या कार्यकालातील पहिल्या-वाहिल्या सभेसाठी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी चांगला 'गृहपाठ' करुन आले होते. मात्र त्यांचाही अपेक्षाभंग झाला.
No comments:
Post a Comment