http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31822&To=7
मित्रासाठी काढलेल्या कर्जाने घेतला जीव !
पिंपरी, 23 जुलै
मित्रासाठी कर्जाऊ पैशांची मध्यस्थी करणे च-होलीतील एका सलून व्यावसायिकाच्या जीवावर बेतली. कर्जाऊ पैशांची परतफेड तर सोडा उलट आपल्याला दमदाटी करून धमकावत असल्याची तक्रार मित्राने केल्याने बिचा-या सलून व्यावसायिकाला पोलिसांच्या ससेमि-याला सामोरे जावे लागले. पोलिसांच्या चौकशीने हैराण झालेल्या या सलून व्यावसायिकाला चौकशी सुरू असतानाच सोमवारी (ता. 23) दुपारी पोलीस चौकीतच ह्रदयविकाराचा झटका आला. रुग्मालयात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) सोपविण्यात आला असून, 'सीआयडी'ने तात्काळ तपास सुरू केला आहे.
No comments:
Post a Comment