http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32024&To=9
गणवेशाच्या सक्तीवर कॉलेज युवकांची नवी युक्ती ! पिंपरी, 30 जुलै
गणवेश हा नियम नसून खरे तर ती एक ओळख असते. शिस्त त्याचबरोबर नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी गणवेशाची नितांत गरज असते. मात्र हल्ली कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'युनिफॉर्म'ला 'नो' म्हणताना नवीन 'फंडा' अंगिकारला आहे. कॉलेजच्या गणवेशाच्या शर्टवर वेगळ्या रंगाची पँट किंवा निळ्या रंगाची जिन्स या नवीन पेहरावाने प्रत्येक ज्युनिअर कॉलेजवर तरुण विद्यार्थ्यांचा घोळका दिसून येत आहे. गंमत म्हणून असा प्रकार आम्ही केला तर काय हरकत आहे अशी प्रतिक्रिया कॉलेज तरुणांकडून व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment