http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32456&To=9
उच्चदाब वीजतारांच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट होऊन चार वर्षाचा मुलगा जखमी
चिंचवड, 17 ऑगस्ट
थेरगावच्या डांगेचौकातील एका इमारतीच्या जिन्याजवळून जाणा-या उच्चदाब वीजतारांच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट होऊन एक चार वर्षाचा मुलगा जखमी झाला. ही घटना थेरगाव येथील डांगे चौकाजवळील सोनिगरा नावाच्या इमारतीमध्ये शुक्रवारी (ता. 17) संध्याकाळी पावणेचारच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात बॉम्बस्फोट झाल्याच्या शक्यतेने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. घटनेची माहिती मिळताच श्वानपथकासहित बॉम्ब शोधक पथक आणि वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासनंतर हा बॉम्बस्फोट नसून अपघात होता असा निर्वाळा पोलिसांनी दिल्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
No comments:
Post a Comment