http://mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32852&To=6
फूटपाथ कोणासाठी ?
प्रशस्त, सुरक्षित आणि उत्कृष्ट असे फूटपाथ शहरातील पादचाऱयांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी आहेत. परंतु ज्या पादचाऱयांसाठी हे फूटपाथ बांधले जातात. त्यांना मात्र फूटपाथवरून नाही, तर वाहनांच्या गर्दीतून वाहनांचे धक्के खात-खात वाट काढत चालावे लागते. स्थानिक फळेविक्रेते, परप्रांतीय कापड व्यावसायिक, मत्स्य व्यवसाय, पानटप-या, खाद्यपदार्थांच्या हातगाडय़ा, बेकायदेशीर कॅसेट्स विक्री, छत्री दुरुस्ती, फूटवेयरवाले आणि मोठय़ा व्यापाऱयांची दारातील फूटपाथवरील मत्तेदारी अशाप्रकारच्या नानाविध कारणांमुळे शहरातील फूटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. प्रशासकीय आणि राजकीय पदाधिकारी, स्थांनिक गुंड यांच्या अर्थपूर्ण संबधामुळे शहरामधील काही व्यावसायिकांसाठी हजारो पादचा-यांचा जीव धोक्यात घातला जात आहे.
No comments:
Post a Comment