‘मेट्रो’ फायलींच्या शेडमध्येच: मान्यतेपूर्वीच घोषणा केल्याचा आरोप, माहिती अधिकारात उघड
पुणे। दि. ३0 (प्रतिनिधी)
शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठीचा महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प अजूनही फायलींच्या शेडमध्येच अडकला आहे. मेट्रोच्या निर्णयाबाबत राज्यशासनाकडे माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागीतली असता या संदर्भातील शासन निर्णयाची फाईल सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.
पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्वल केसकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अंतिम निर्णय झाला नसताना राज्यशासनाने मेट्रोच्या मान्यतेची घोषणा करून पुणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप केसकर यांनी यावेळी केला. या माहितीमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment