आरक्षण, बांधकाम परवान्यांची माहिती एका 'क्लिक'वर !
पिंपरी, 31 ऑगस्ट
घर खरेदी करताना होणारी सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकास आराखड्यातील आरक्षित जागा, अधिकृत परवाना दिलेल्या बांधकामांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळासह नागरी सुविधा केंद्रांमध्ये उपलब्ध करुन दिली आहे. भूखंड खरेदी करताना नागरिकांना घरबसल्या 'एका क्लिक'वर आरक्षणाबाबतची माहिती मिळणार असल्याची माहिती शहर अभियंता एम. टी. कांबळे व नगररचना व विकास विभागाच्या उपसंचालक प्रतिभा भदाणे यांनी आज (शुक्रवारी) दिली.
No comments:
Post a Comment