दगडफेकीला लाठीमाराने प्रत्युत्तर: - वाकडमधील १५ अनधिकृत बांधकामे पाडली
- नागरिकांचा विरोध काढला मोडून
वाकड / पिंपरी । दि. ३१ (वार्ताहर)
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आज वाकड येथे तीन हॉटेलांसह १५ ठिकाणची अनधिकृत बांधकामे पाडली. संतप्त जमावाने दगडफेक करून कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी जोरदार लाठीमार करून चोख प्रत्युत्तर दिले. दगडफेकीत प्राधिकरण अधिकार्यासह, तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. हिंजवडी पोलिसांनी गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली आहे.
No comments:
Post a Comment