Wednesday, 5 December 2012

काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी बीआरटीएससाठी 49 कोटींचा खर्च !

काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी बीआरटीएससाठी 49 कोटींचा खर्च !
पिंपरी, 4 नोव्हेंबर
भूसंपादन रखडले असतानाही काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी या 11.2 किलोमीटर बीआरटीएस रस्त्याच्या विकसनात महापालिकेने घाई गडबड सुरु केली आहे. ताब्यात असलेल्या जागेचाच टप्प्याटप्प्याने विकास करण्याचे धोरण ठरविणा-या महापालिकेने चौथ्या टप्प्यात 49 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. कुपोषित स्थायी समितीला 'व्हिटॅमिन एम' पुरविण्याचे फर्मान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडताच महापालिका प्रशासनाने तत्काळ बीआरटीएस प्रकल्पाची 49 कोटींची निविदा काढल्याने तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment