Wednesday, 5 December 2012

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार
पिंपरी, 4 डिसेंबर
पिंपरी-चिंचवड शहराच्या चिरंतन व चिरस्थायी विकासासाठी महापालिकेचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. यामध्ये जुन्या उद्यानांसह नव्याने प्रस्तावित असलेल्या सिटी सेंटर, औद्योगिक प्रदर्शन केंद्र, लेझर शो, अत्याधुनिक मत्स्यालय यांसारख्या शहरातील 23 पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. त्यामुळे 'कामगारनगरी' आता 'पर्यटननगरी' होणार आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करताना नागरिकांनी केलेल्या सूचनांचा समावेशही केला जाणार आहे. येत्या 15 व 16 आणि 22 व 23 डिसेंबर रोजी हा आराखडा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment