महापालिका इमारतही "इको फ्रेंडली' होणार पिंपरी - नेहरूनगर रस्त्यालगतच्या बंद असलेल्या महेंद्र कंपनीच्या जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी प्रशस्त पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) इमारत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. औद्योगिक क्षेत्राचे निवासीमध्ये परिवर्तन (आयटूआर) करताना महापालिकेला मिळालेल्या सहा एकर जागेवर हे संकुल उभारण्याचा विचार सुरू आहे.
प्राधिकरण कार्यालयाच्या "इको फ्रेंडली' इमारतीचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 8) झाले. आता पिंपरी-चिंचवड महापालिकाही भविष्यातील गरज म्हणून कार्यालयाची नवीन इमारत बांधण्याच्या तयारीत आहे.
No comments:
Post a Comment