Tuesday, 28 May 2013

मासूळकर कॉलनीत 30 मे पासून मोफत ...

मासूळकर कॉलनीत 30 मे पासून मोफत ...:
ग्रामविकास प्रतिष्ठान, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मासूळकर कॉलनी येथे 30 मे ते 30 जुलै या कालावधीसाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

कमीतकमी वयाची 15 वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होणा-या उमेदवारांकडून नाममात्र शुल्क अनामत रक्कम म्हणून घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अनामत रक्कम परत केली जाईल. तसेच पूर्ण करणा-यांना शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी 29 मे पर्यंत नावनोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी चंद्रकांत भोसले 9923677851 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment